
नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर.
शहरातील रसिकनगर, नागसेन परिसर येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत भिमजंयती मंडळाच्या अध्यक्षपदी गौतम शंकर मिसाळे तर सचिवपदी सिद्धार्थ वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली.
२२ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता नागसेननगर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी कार्यकारिणी निवड झाली. यात उपाध्यक्ष सी.एन. वाघमारे, सहसचिव उदय वाघमारे, कोषाध्यक्ष भगवानराव कदम, सहकोषाध्यक्ष किशनराव सोनकांबळे, सल्लागार खंडुराव
सोनकांबळे, एस.टी. जाधव, चंदर मिसाळे, प्रसिद्धी प्रमुख जी.पी. मिसाळे, लक्ष्मण तुरेराव यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून गंगाधरराव वाघमारे, डॉ. सुरेश देवे, अशोक कांबळे मरवाळीकर, गायकवाड आर.जी., नागोराव कांबळे, शुद्धोधन बनसोडे, डॉ. संदिप बनसोडे, दिगांबर कांबळे, सदानंद देवके, सुहास वाघमारे, अजय सूर्यवंशी, विनय पाचपींपळीकर यांची निवड करण्यात आली. यावेळी रसिकनगर येथील बौद्ध उपासक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.