युनायटेड युथ पँथर आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन….!


युनायटेड युथ पँथर चे संस्थापक

कालकथित प्रसाद अनिल जाधव यांनी २०२४ साली युनायटेड युथ पँथर संस्थेची स्थापना केली आणि त्यानंतर त्यांनी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कामोठे येथे १४ एप्रिल २०२४ साठी प्रथमच कामोठे मध्ये सर्वात मोठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त ३५ फूट बॅनर चे अनावरण केले. त्यानंतर 12 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचे अपघाती निधन झाले.

त्यांनी सुरू केलेल्या या समाजकार्याचा त्यांच्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी हा वारसा पुढे चालू ठेवला.

वर्षी संस्थेचे तिसरे वर्ष आहे. 14 एप्रिल 2026 साठी

तारीख 10 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कामोठे येथे भीम जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भल्या मोठ्या बॅनरचे अनावरण करण्यात आले.

तसेच 13 एप्रिल आणि 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डीजे लावण्यात आला होता.

याप्रसंगी युनायटेड युथ पँथर चे संस्थापक कालकथित प्रसाद अनिल जाधव यांचे वडील आयु. अनिल जाधव, आई एकता जाधव, मोठी बहीण पूजा, छोटी बहीण प्राची जाधव, आणि परिवार आणि विविध पक्षाचे तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी उपस्थित होते.

उपस्थितांनी युनायटेड युथ पँथर चे संस्थापक कालकथित प्रसाद अनिल जाधव यांना आदरांजली वाहिली.

युनायटेड युथ पँथर चे संस्थापक कालकथित प्रसाद अनिल जाधव त्यांनी सुरू केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॅनर सर्वात मोठे बॅनर चे अनावरण हा संकल्प पुढे वारसा म्हणून आम्ही सुरू ठेवू असे युनायटेड युथ पॅंथर चे अध्यक्ष प्रणय अरूने आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


Leave a Comment

error: Content is protected !!