डोंबिवलीत तलवार आणि चाकूने हल्ला करणारे अटक नाही?


डोंबिवली प्रतिनिधी : डोंबिवली तलवार आणि चाकूने हल्ला करणारे अट्रॉसिटी गुन्हातील आरोपीना तात्काळ अटक करावी सह इतर मागणीसाठी एसीपी कार्यावरती मोर्चा काढण्यात आला. मोर्चा फुले नगर मधून निघाला सम्राट अशोक चौक मार्ग द्वारका हॉटेल समोर डोंबिवली (पश्चिम) येथे मोर्चा चे समारोह झाले. सहायक पोलीस आयुक्त (डोंबिवली विभाग)मा. सुहास हेमाडे सर यांनी बाकी आरोपीला अटक करण्याची आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.

 

 

 

सर्व पक्षीय आजचे आंदोलन होते, नेतृत्व :रेखाताई कुरवारे (वंचित बहुजन आघाडी),नरसिंग गायसमुंद्रे ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष ), दिपक भालेराव,सुधीर सावंत,वैशालीताई कांबळे, ज्योती सुरवसे,दत्ता सावने, दिलीप काउतकर,विजय शेळके, राजू खरात, योगेश मोरे, सागर खिल्लारे, कबीर धबाले, तथागत खिल्लारे, राहुल धबाले, उपस्थित होते. डोंबिवली मध्ये सर्व जाती समूहाचे लोकांनी बंधू भावाने एकत्र राहायला पाहिजे, असा आशावाद संदेश मोर्चाचे नेतृत्व करणारे मा.नरसिंग गायसमुंद्रे यांनी वेक्त केला. पोलीस प्रशासनाने डोंबिवली मध्ये भविष्यात दादागिरी करून गंभीर प्रकरण होणार नाही त्या साठी प्रभावी प्रतिबंधक उपयोजना करण्यात यावे अशी आंदोलकानी मागणी केली.


Leave a Comment

error: Content is protected !!