गोळेगाव येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम उत्साहात पार पडला.


लोहा. गोळेगाव :दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी तपोवन बुद्धभूमी, गोळेगाव ता. लोहा जि. नांदेड येथे कार्तिक पौर्णिमा मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ९ वाजता सूत्रपठनाने झाली. सूत्रपठनानंतर पूज्य भंते बोधीधम्मो यांच्या उपस्थितीत भोजनासाठी चारीका तसेच भव्य भोजनदान कार्यक्रम पार पडला.

दुपारी ठीक १२ वाजता पूज्य भंते बोधीधम्मो यांची प्रेरणादायी धम्मदेशना झाली. या वेळी मोठ्या संख्येने उपासक-उपासिका, नागरिक आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या कार्यक्रमामुळे परिसरात धार्मिकतेचे, शांततेचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.


Leave a Comment

error: Content is protected !!