प्रतिनीधी:- सागरभाऊ लोंढे, उपसंपादक
रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात आज आचार्य अकॅडमी बारामती चे प्रशासकीय अधिकारी रामराजे घोरपडे सर व समुपदेशक प्रवीण मारकड सर यांनी इयत्ता दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांना आपले करिअर कसे घडवावे यासाठी मार्गदर्शन केले.

त्याचबरोबर करिअरच्या वेगवेगळ्या संधी कशा पद्धतीने उपलब्ध आहेत आणि आपण त्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने करिअर करावे याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाच्या वतीने आचार्य अकॅडमीचे रामराजे घोरपडे सर व प्रवीण मारकड सर यांचा विद्यालयाचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील विद्यालय मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला तसेच पर्यवेक्षक धनाजी गावडे व लिपिक दत्तात्रय काळे हे ही यावेळी उपस्थित होते.
