
प्रतिनीधी:- सागरभाऊ लोंढे (उपसंपादक)
रुई तालुका इंदापूर येथील श्री. बाबीर विद्यालययात शासकीय एलिमेंटरी ग्रेड परीक्षा आजपासून सुरू होत आहे, या परीक्षेसाठी या रुई केंद्रातून 263 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत तर इंटरमिजिएट साठी 288 विद्यार्थी असे एकूण 551 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.
श्री बाबीर विद्यालया बरोबरच इतरही खालील शाळांनी या परीक्षेची विद्यार्थी प्रविष्ट केले आहेत – भैरवनाथ विद्यालय भिगवण, के एस के भिगवन, श्री अंकलेश्वर विद्यालय अकोले, न्यू भैरवनाथ विद्यालय काझड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायसेवाडी,प्रगती विद्यालय लोणी देवकर, नूतन माध्यमिक विद्यालय कौठळी, श्री शिवाजी विद्यालय वरकुटे बु, कमल विद्यालय बाबुळगाव, काळभैरवनाथ विद्यालय कळाशी. श्री हनुमान विद्यालय अवसरी.
वरील सर्व विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांना आज प्रथम त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भैरवनाथ विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरज पाटील, युवा कार्यकर्ते बाळासाहेब पाटील प्रगतशील बागायतदार नवनाथ नरूटे -पाटील, शिक्षक सोसायटीचे चेअरमन नानासो घळके व इतर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचा त्यांच्या समवेत आलेल्या शिक्षकांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक जगन्नाथ पाटील यांचे हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी उपकेंद्र संचालक अमीन मुल्ला यांनी परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन पर्यवेक्षक धनाजी गावडे यांनी केले. वरील सर्व विद्यार्थ्यांना कर्मवीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पाटील,उपाध्यक्ष उदयसिंह पाटील,रुई गावचे पोलीस पाटील अजित सिंह पाटील त्याचप्रमाणे सर्व शिक्षक- गुरुकुल चा स्टाफ व कर्मचारी वृंद यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या व परीक्षा सुरळीत सुरू करण्यात आली.