श्री. बाबीर विद्यालयात चित्रकला ग्रेड परीक्षा कार्यशाळा उत्साहात संपन्न


प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे, उपसंपादक 

   (आवाज वंचित बहुजनांचा न्यूज)

 रुई तालुका इंदापूर: येथील श्री. बाबीर विद्यालय या ठिकाणी 28 तारखेपासून सुरू होत असलेल्या एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट च्या परीक्षेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांच्या संकल्पनेतून व कलाशिक्षक आणि मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी उत्कृष्ट कलाशिक्षक श्रीराम सावंत यांनी स्मरण चित्राचे रेखाटने कशा पद्धतीने काढावी आणि रंगवावी याबद्दल माहिती दिली. तसेच वस्तू चित्र बद्दल छत्रपती हायस्कूल सणसरचे उत्कृष्ट कलाशिक्षक परशुराम घाडगे यांनी वस्तू चित्राचे रेखाटन व रंगकाम करून दाखवले. नीलकंठेश्वर विद्यालयाची कलाशिक्षक दीपक शिंदे यांनी सर्वच विषयाबद्दल सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपल्या विद्यालयाचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या शुभ हस्ते वरील तिघांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

  सोमवारपासून सुरू होत असलेल्या एलिमेंट्री साठी या विद्यालयातून 128 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे तर इंटरमिजिएट साठी 70 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.

   या दोन्ही परीक्षा पास असणारे विद्यार्थ्यांना एस एस सी बोर्ड त्यांना ए श्रेणीसाठी सात गुण बी श्रेणीसाठी पाच गुण आणि सी श्रेणीसाठी तीन गुण असे गुण दिले जातात त्यामुळे या परीक्षेला बसण्याचा विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. म्हणून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगली श्रेणी पडावी यासाठी कला शिक्षक अमीन मुल्ला हे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा घेत असतात आणि त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होत असतो.


Leave a Comment

error: Content is protected !!