भीम आर्मी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक मागण्यांबाबत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे, उपसंपादक

(आवाज वंचित बहुजनांचा न्यूज)

सोलापूर: भीम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ कांबळे व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा सोलापूर प्रभारी संदीप भाऊ शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महामहिम राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.

सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मनोज कडाळे आणि त्यांच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीच्या टीमतर्फे हे निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी भीम आर्मीच्या वरिष्ठ नेत्या सोलापूर शहराध्यक्ष विशाखा ताई उबाळे आणि भीम आर्मीचे महाराष्ट्र मीडिया प्रमुख कीर्तीपाल सर यांची विशेष उपस्थिती होती.

निवेदनातील प्रमुख मागण्या:   SC, ST आणि OBC विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये (UGC) समान संधी मिळून जातीवर आधारित भेदभाव रोखण्यासाठी कडक नियमावली लागू करावी.   मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी पूर्णपणे लागू करण्यात याव्यात.   

केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि बजेटमध्ये SC, ST, OBC व इतर वंचित घटकांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य हिस्सा निश्चित करावा.  सरकारी सेवांमध्ये लॅटरल एंट्री आणि आऊटसोर्सिंग बंद करून सर्व रिक्त पदांवर कायमस्वरूपी भरती (बॅकलॉग) केली जावी.

सेप्टिक टँकच्या सफाईदरम्यान मृत्यू झाल्यास सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ३० लाख रुपयांची भरपाई, सरकारी नोकरी आणि पुनर्वसन देण्यात यावे.  विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, मोफत व स्वस्त वसतिगृहांची (हॉस्टेल) मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात यावी.

या वेळी सोलापूर भीम आर्मीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मनोज कडाळे, शहराध्यक्ष विशाखा ताई उबाळे, महाराष्ट्र मीडिया प्रमुख कीर्तीपाल सर यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!