वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला उस्माननगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; शाळा, महाविद्यालये व बाजारपेठ बंद, शांततेत आंदोलन


उस्माननगर दिल्ली येथील जंतर – मंतरवर

 विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उस्माननगरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील व्यापाऱ्यांनी आपले व्यापार व व्यावसायिक आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दर्शविला.विशेष म्हणजे दि.२३ जुलै रोजी लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी व्यवहार पूर्णपणे बंद ठेवत बंदमध्ये सहभाग नोंदविला.त्यामुळे उस्माननगर येथील प्रमुख बाजारपेठेत शुकशुकाटात दिसून आला. व यावेळी उस्माननगर येथील सर्व शाळा ,महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते.

 उस्माननगर येथील बसस्थानक जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या पासी आंदोलकांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध व्यक्त करत भारत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यास जबाबदार असलेल्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करून अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

या बंदमध्ये उस्माननगर येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील तरूण विद्यार्थ्यां मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बंद आंदोलनाला कोणतेही वळण लागू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेत विविध ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

 सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील सुर्यवंशी व त्यांची टीम परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होती. आंदोलकांनीही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याची भूमिका घेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली.

पोलीस प्रशासन आणि आंदोलकांच्या समन्वयामुळे उस्माननगर येथे महाराष्ट्र बंद पूर्णपणे शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. वंचित बहुजन आघाडीच्याआंदोलनकर्त्यांनी उस्माननगर येथील पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक महेश मुळीक यांना निवेदन दिले. यावेळी राहुल देवराव सोनसळे, तेजस विजय भिसे,हर्ष सोनसळे ,अंकुश कांबळे अंगुलीमाल सोनसळे , राजाराम सोनटक्के ,खाजा शेख,अखिल शेख, सगिर शेख, फयाज शेख, गंगाप्रसाद वाघमारे,पवन सोनसळे,मिलींद सोनसळे, सुफियान शेख, मुंतली पिंजारी,वसंत भिसे,नागेश सोनसळे ,श्रावण मोरे,लखन सोनसळे, बालाजी कांबळे,जिवन सोनसळे,बंटी भिसे ,सुमेध सोनसळे,यश सोनसळे,अजय सोनसळे , यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!