जायकवाडी वसाहत प्रकरणी २३ जूनला तहसीलवर धडक मोर्चा; वंचितचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांची घोषणा


जायकवाडी वसाहतीतील पंचशील ध्वज हटविल्याच्या निषेधार्थ २३ जूनला तहसीलवर धडक मोर्चा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

लोहा – जायकवाडी वसाहत मधील पंचरंगी ध्वज व विश्वशांती बौध्द विहाराचा नाम फलक काढल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचा तहसिलवर धडक मोर्चा काढण्यात येनार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष शकर महाजन यांनी आज त्रिरत्न बौध्द विहार येथे आयोजित बैठकीत सांगीतले.

             लोहा शहरातील कंधार रोड लगत असलेल्या जायकवाडी वसाहत मध्ये मागील ३५ वर्षापासून असलेल्या पंचरंगी ध्वज व विश्वशांती बौध्द विहाराच्या नियोजित जागेवरील नाम फलक काही दिवसा पूर्वी काही समाज कंटकांनी काढून टाकल्या प्रकरणी पाच दिवसात ध्वज पुन्हा होता त्या ठिकाणी उभारा नाहीतर तिव्र आंदोलन करन्यात येनार असल्याचे वंचित बहुजन आघाडी व बौध्द बांधवांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन दिले होते पण यावर तहसिलदार यांनी कोणतीहा कार्यवाही केली नाही यामुळे आज सकाळी त्रिरत्न बौध्‍द विहार येथे बैठकीचे आयोजन करन्यात आले होत. याप्रसंगी समाजाच्या तिव्र भावना लक्षात घेता.२३ जुन रोजी लोहा तहसिलवर बेधडक मोर्चा काढण्यात येनार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नांदेड ( द) जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी बैठकीत सांगीतले.

यावेळी वचिंत बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा.राज आटकोरे,जिल्हा महासचिव रवि पंडीत,भारतीय बौध्द महासभा माजी जिल्हाध्यक्ष पी.एम.वाघमारे, विनायक गजभारे,जिल्हा सचिव रंगनाथ गजले,जिल्हा सल्लागार डॉ.राम वनंज, माजी नगरसेवक ॲड .पंचशिल कांबळे, उत्तम महाबळे, जेष्ठ आंबेडकरी चळवळीचे नेते गंगाधर महाबळे, जिल्हा सचिव दिपक मगर, ॲड . जयपाल ढवळे, विद्यानंद पोवळे गणपत सवय सोनकांबळे अविनाश कांबळे, छगन हटकर, प्रदिप सोनकांबळे,बाळासाहेब खिल्लारे, माजी नगराध्यक्ष सौ.त्रिशला कांबळे, साधना एंगडे, ज्योती सावळे,अशिष कांबळे,सुभाष खाडे,विलास सोनकांबळे, रमाकांत वाघमारे,देवानंत रायबोले, बालाजी रायबोले, गौतम गोडबोले,आनंदा दुंडे ,सुनिल जोंधळे, धम्मपाल कांबळेख,कुणाल कांबळे, सुजित वाघमारे,दयानंद वाघमारे, उत्तम ढवळे, श्याम वाघमारे, गौतम हंकारे, गिरीष भालेराव श्रावण गायकवाड सह मोठया संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व बौध्द समाज बांधव मोठया संख्येने उपस्थीत होता.


Leave a Comment

error: Content is protected !!