मुदखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीसाठी मारुती डुबुकवाड यांचे आमरण उपोषण सुरू!


मुदखेड : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यासाठी रीतसर परवानगी मिळावी, यासाठी वारंवार अर्ज करूनही प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने संतप्त झालेले मुदखेड येथील सामाजिक कार्यकर्ते मारोती शिवाजी डुबुकवाड यांनी दि १ जून २०२६ पासुन आमरण उपोषण सुरू केले आहे.

​२१ दिवसांच्या साखळी उपोषणानंतर आमरण उपोषणाचे हत्यार ​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,

 

 पुतळा उभारणीच्या परवानगीसाठी मारोती डुबुकवाड हे गेल्या २१ दिवसांपासून दि. १२ मे २०२६ पासून सातत्याने साखळी उपोषणाला बसले होते. मात्र, २१ दिवस उलटूनही मुदखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी किंवा तहसीलदार यांनी अद्याप उपोषणस्थळाला भेट देऊन त्यांची साधी विचारपूसही केली नाही. प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा थेट आरोप आंदोलकाने निवेदनाद्वारे केला आहे. प्रशासनाच्या या उदासीन आणि आडमुठ्या धोरणामुळे अखेर दि. १ जून २०२६ रोजी पासुन आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

 

​’त्या’ तीन अधिकाऱ्यांवर संपूर्ण जबाबदारी ​उपोषणकर्ते मारोती डुबुकवाड यांनी दिली जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला लेखी पत्र देऊन इशारा दिला आहे की, या उपोषणादरम्यान त्यांच्या जीवाला काही बरे-वाईट झाल्यास त्याला खालील व्यक्ती पूर्णपणे जबाबदार राहतील:

१) मा. मुख्याधिकारी साहेब (न.प मुदखेड) २) मा.सौ. विश्रांतीताई माधवराव कदम (नगराध्यक्ष मुदखेड ) ३) मा. इंजिनियर कुलकर्णी साहेब (न.प मुदखेड)

​जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी ​”नगर परिषदेने तात्काळ पुतळा उभारणीचा ठराव घेऊन तो मा. जिल्हाधिकारी साहेबांकडे मंजुरीसाठी पाठवावा,” अशी मागणी उपोषणकर्त्याने केली आहे. तसेच मा.जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणात स्वतः लक्ष घालून तात्काळ दखल घ्यावी, अशी विनंतीही पत्राद्वारे करण्यात आली आहे.

​या आंदोलनाचे पत्र मुदखेड तहसील कार्यालय, नगरपरीषद आणि मुदखेड पोलीस स्टेशन येथे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले असून, प्रशासकीय वर्तुळात आता यावर काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण मुदखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!