नरसापूर अत्याचार प्रकरणी संताप; आरोपीला फाशीची मागणी – वंचित बहुजन महिला आघाडीचे जिल्हाभर निवेदन


प्रतिनिधी : शेख हसन

आज वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या आदेशानुसार निवेदन देण्यात आले त्यामध्ये खालील विषय होता

 

 नरसापुर येथे भीमराव कांबळे नावाच्या व्यक्तीने एका साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला दगडाने ठेचून मारून टाकले व तिचा मृतदेह शेनाच्या ढिगाऱ्याखाली दाबून टाकला ही घटना अत्यंत संताप जनक असून मानवतेला काळीमा फासणारी आहे अशा मानवी कृत्याला समाजात अजिबात थारा नाही

आरोपी हा आरोपीच असतो त्याला कोणतेही दयामया न दाखवता पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी राज्याच्या गृहमंत्र्यांना स्पष्ट शब्दात आम्ही सांगू इच्छितो की महिलांच्या मानसनमानावर घाला घालणाऱ्या नराधमांना कुठलीही सूट देता कामा नये या प्रकरणात कुठलाही हलगर्जीपणा जनता सहन करणार नाही पिढीतेला न्याय मिळाला पाहिजे आणि भविष्यात अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती करण्याची हिम्मत कोणी करणार नाही याची खात्री प्रशासनाने घ्यावी नरसापुर अत्याचार प्रकरणी आरोपीला तात्काळ शिक्षा द्या या मागणीसाठी पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी नवले पूल या ठिकाणी रास्ता रोको केला होता

याच आंदोलकावर पुणे पोलिसांनी लाठीच्या केला जमावाला बेदम मारहाण केली जे पोलीस या मारहाण प्रकरणात असतील अशा पोलिसांना सुद्धा त्वरित बडतर्फ करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले निवेदनावर खालील सह्या होत्या विशाखाताई सावंग जिल्हाध्यक्ष महिला आघाडी ,करुणा लांडगे ,भाग्यश्री सोनोने तालुकाध्यक्ष, गीताबाई खोंदील मायाबाई कस्तुरे सुनिता खोंदिल गयाबाई जाधव छाया जाधव


Leave a Comment

error: Content is protected !!