स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ, कंधारची कार्यकारिणी जाहीर


 

कंधार : स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाच्या कंधार तालुका कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष मा. डी. एस. लोखंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे ऍड गुणाजी मोरे, शेख शकील, गजानन कदम उपस्थित होते.

 

यामध्ये तालुका अध्यक्षपदी प्रणितकुमार बालाजीराव आनकाडे यांची निवड करण्यात आली असून तालुका उपाध्यक्षपदी गजानन भागवत देवणे व संदीप आप्पाराव तोंडचिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर अध्यक्ष म्हणून प्रेमानंद रमाकांत गायकवाड यांची निवड झाली आहे.

 

तसेच तालुका कार्याध्यक्ष म्हणून लक्ष्मण रोहिदास कांबळे, तालुका कोषाध्यक्ष म्हणून सुरज बालाजीराव आनकाडे, सचिवपदी माधव रामू गोटमवाड व सहसचिवपदी मच्छिंद्र शंकर बाबर यांची निवड करण्यात आली आहे.

 

तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून हेमंतकुमार गणपतराव कंधारकर, तालुका डिजिटल मीडिया अध्यक्ष म्हणून इंद्रजित उत्तमराव गिरी, पत्रकार विरोधी हल्ला समिती अध्यक्ष म्हणून बालाजी माधव बसवंते यांची निवड झाली आहे.

 

याशिवाय तालुका संपर्क प्रमुख म्हणून एकनाथ व्यंकटेश मिरकुटे आणि तालुका संयोजक म्हणून विद्यासागर वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडविणे, त्यांच्या हक्कांसाठी लढा देणे आणि संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविणे, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव गोटमवाड यांनी केले व आभार प्रणितकुमार आनकाडे यांनी मानले.


Leave a Comment

error: Content is protected !!