शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना जिल्हयात विविध ठिकाणी सामूहिक वाचन


जालना : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हयात शिवाजी कोण होता? या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे वाचन करण्यात आले. कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक हे ‘कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा या पुस्तकांमधून त्यांनी मांडली पण इथल्या काही लोकांनी महापुरुषां चे विचार स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले आहे, हे षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाने केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कॉ. गोंविद पानसरे लिखित असलेले शिवाजी कोण होता? हे पुस्तकाच्या प्रकाशकाला आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करत त्यांना धमकी दिली या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्यामध्ये जालना शहरातील मनपा कार्यालयातील महात्मा फुले स्मारका समोर व परतुर तालुक्यातील आष्टी,मंठा तालुक्यातील वैद्य वडगांव यासह विविध ठिकाणी सामूहिक वाचन करून निषेध व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले होते की, प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन चौकाचौकामध्ये करा या आव्हानास प्रतिसाद देत जिल्ह्यात विविध ठिकाणी सामुहिक वाचन करण्यात आले.

जालना जिल्ह्यातील वैद्य वडगांव येथे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या नेतृत्वाखाली सामुहिक वाचन करण्यात आले यावेळी तालुका सचिव अशिष मोरे दिलीप मगर गौतम मगर अर्जुन घुगे योगेश उघडे ईश्वर डोके किरण डोके संतोष मगर बाबासाहेब लहाने गजानन पाईकराव गुलाब मगर रोहिदास सदावर्ते गोविंद मगर भिकाजी निकाळजे सुभाष प्रधान आनंद मगर समाधान मगर बालू लाखे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.

 


Leave a Comment

error: Content is protected !!