कळमनुरी 03 दिवसांपासून दवाखान्यात पाणी नाही, शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार, वंचित बहुजन आघाडी मार्फत रुग्णांना पाणी बॉटल वाटप


कळमनुरी : 03 दिवसांपासून दवाखान्यात पाणी नाही, शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार, वंचित बहुजन आघाडी मार्फत रुग्णांना पाणी बॉटल वाटप यासाठी जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करा.

कळमनुरी शहरात असणारे शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे अनेक दिवसापासून सुविधेचा अभाव आहे वैद्यकीय अध्यक्ष असो वरिष्ठ असो सर्व जन या बाबींकडे अतिशय दुर्लक्ष करून रुग्णांचा जीव धोक्यात घालण्याचे काम इथले डॉक्टर अधिकारी व कर्मचारी करत आहेत.गेली 03 दिवसापासून मोठ्या प्रमाणात गंभीर असलेले रुग्ण अॅडमिट असताना 03 दिवसापासून कोणत्याच बाबीसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. वारंवार डॉक्टरांना सांगून सुद्धा हा प्रश्न पूर्ण न झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व रुग्णयांना पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.

एवढी गंभीर बाब असताना सुद्धा प्रशासन अत्यंत निष्काळजीपणा बेरोजबाबदारपणे वागत असून वरिष्ठ सुद्धा भग्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे यामधील दोषी असणाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हाधिकारी यांना केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राजू कांबळे, मोहम्मद अस्लम दिनेश पाईकराव,जितेश कदम ,राजे रणवीर,अमोल पुंडगे व इतर उपस्तित होते.

Oplus_16908288

Leave a Comment

error: Content is protected !!