प्रतिनिधी : प्रदीप जाधव
उल्हासनगर येथील रहिवासी स्वर्गीय यशोदा बाई पवार यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कुटुंबीयांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यशोदा बाई पवार यांना दोन सुपुत्र असून सुहास पवार (सून शुभांगी) आणि सुभाष पवार असे त्यांचे नावे आहेत. तसेच त्यांना हिरा, उमा आणि पौर्णिमा अशा तीन कन्या आहेत. जावई रघुनाथ, प्रकाश आणि राजेश यांनीही या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

या प्रसंगी कुटुंबीय व नातेवाईकांनी यशोदा बाईंच्या प्रेमळ स्वभाव, कष्टाळू वृत्ती आणि कुटुंबाप्रती असलेल्या निस्वार्थ प्रेमाच्या आठवणी जागवून त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या कार्याची आणि संस्कारांची छाप आजही कुटुंबावर कायम असल्याचे सर्वांनी नमूद केले.
स्वर्गीय यशोदा बाई पवार यांच्या स्मृती सदैव सर्वांच्या मनात जिवंत राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.