नांदेडात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात निवेदन; दि. 14 एप्रिल रोजी स्वाक्षरी मोहिमेची घोषणा


नांदेड येथे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री तसेच संबंधित समितीच्या अध्यक्षांकडे तातडीने ई-मेलद्वारे पाठविण्यात आले.

दरम्यान,  दि. १४ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच नांदेडमधील पुढील आंदोलनाची भूमिका लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

 युवा पँथर संस्थापक – राहुल एस. एम. प्रधान


Leave a Comment

error: Content is protected !!