
जिल्हा प्रतिनिधी :धम्मानंद कांबळे
गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नांदेड येथे ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ चे आंदोलन
नांदेड : वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ या विषयावर आगामी ६ एप्रिल रोजी नांदेड येथे मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्हातील सर्व रेस्टांरट मालंक भोजनालय वस्तीगृह चालक छोटे हाॅटेल व्यंवसाईक घरकुती गॅस वापरकर्ते एल.पी.जी वर चालनारे आटो चालक यांनी नांदेड येथील अंदोलनात सहभागी व्हावे असे अव्हान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यानी केली आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी नांदेड जिल्हा आणि शहर पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक विसावा हाॅटेल येथे पार पडली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे राज्यस्तरीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र जमून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवणार आहेत.
या बैठकीस राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद सर, राज्य कार्यकारणी सदस्य अविनाशजी भोसीकर, जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, जिल्हाध्यक्ष राज अटकोरे,गट नेते प्रंशात इंगोले, जिल्हा महासचिव रवि पंडीत, जिल्हा महासचिव दिपक मगर, संजय टिके जिल्हा संघटक, माजी शहरअध्यक्ष विठ्ठल गायकवाड, नगरसेव, राहुल सोनसळे, सय्यद रिजवान नगरसेवक प्रतिनिधी, नगरसेवक शेख बिलाला,आकाश जोधळे नगरसेवक प्रतिनिधी,कुलदिप राक्षसमारे यांनी मनोगत व्यक्त केले केले.
विसावा हाॅटेल नांदेड या ठिकाणी बैठक सपन्न झाली या वेळी विनय गजभारे,रंगनाथ गजले, गणपत स्वामी सोनकांबळे डॉ. रामचंद्र वनंजे अरुण भद्रे एडवोकेट जयपाल ढवळे, भगवानराव हनुमंते, नामदेव पांचाळ, प्रकाश कोल्हे, विद्यानंद पवळे, गौतम डुमणे, के. एच. वने, उत्तम वाढवे प्रल्हाद इंगोले ,बालाजी सावंत, रामराव ढवळे, गंगाधर वाघमारे, पंढरी अहंकारे, धमा गावंडे, गौतम देवके, अनिल गायकवाड, प्रा. राजकुमार ढवळे बी.बी. गायसमुद्रे सावळे मॅडम, महाबळे साहेबराव कोपरेकर, संदेश गायकवाड यास अनेक पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. आंदोलनाची रणनीती ठरवताना कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
बैठकीला जिल्हा आणि शहरातील पदआधिकारी उपस्थित होते.
गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून, या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालाया समोर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यानी केली आहे.




