जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
जालना:आरएसएस मुख्यालयावरील “विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संविधान चौक ते रेशीम बाग आर एस एस मुख्यालय नागपूर येथे दिनांक २३ मार्च २०१६ रोजी काढण्यात येणार आहे.

या मोर्चात सहभागी होण्यासाठी दिनांक २२ मार्च २०२६ रोजी जालन्यातील पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हा संघटक राजेंद्र खरात, तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, ज्ञानेश्वर बोबडे, प्रकाश बोर्डे, अन्ना साबळे,गौतम मगर, विजय मगर, गौतम बोर्डे, शत्रुघ्न कोळी रामु खरात योगेश उघडे, गजानन पाईकराव, रंगनाथ वानखेडे यांच्या सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जालन्याहुन नागपूर ला रात्री उशिरा रवाना झाले आहेत.
