झुंजार पत्रकार सूर्यकांत वाघमारे बारूळकर यांचा वाढदिवस साजरा


उस्माननगर : दै. युगांतर चे ता. कंधार येथील झुंजार पत्रकार व तालुका प्रतिनिधी तसेच आवाज वंचित बहुजनाचा न्यूज चॅनेल चे जिल्हा प्रतिनिधी आणि एस.एल. न्यूज चॅनेल चे संपादक आयु. सूर्यकांत लक्ष्मणराव वाघमारे बारूळकर यांचा वाढदिवस उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत असताना सूर्यकांत वाघमारे यांनी समाजातील वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडत न्यायासाठी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या लेखणीद्वारे तसेच सामाजिक कार्यातून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार होत असून त्यांच्या कार्याबद्दल समाजात विशेष आदर व्यक्त केला जातो.

वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अमिनशाह फकिर, पोलीस पाटील विश्वभर मोरे तसेच आवाज वंचित बहुजनाचा न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक धम्मानंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सूर्यकांत वाघमारे यांना शाल व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची प्रशंसा केली. तसेच पुढील काळातही त्यांनी समाजातील प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवत सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील पत्रकारिता व सामाजिक वाटचालीसाठी भरभरून यश लाभावे, अशा मंगलमय सदिच्छा व्यक्त केल्या.


Leave a Comment

error: Content is protected !!