
परतूर (ता. परतूर) प्रतिनिधी – दिपक नाटभजन
परतूर शहरातील 6 वर्षीय चिमुकल्या हसनैन फिरोज शेख याने पवित्र रमजान महिन्यात आपला पहिला रोजा ठेवत कुटुंबियांसह परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे. एवढ्या लहान वयात रोजा पूर्ण केल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
हसनैनला रोजा ठेवण्यासाठी त्याचे दादा बिबन शेख, तसेच चाचा उस्मान शेख आणि राजु शेख यांचे मार्गदर्शन लाभले. कुटुंबियांनी त्याला प्रोत्साहन देत धार्मिक संस्कारांची शिकवण दिली. दिवसभर उपवास पाळून हसनैनने सायंकाळी नमाज अदा केल्यानंतर रोजा सोडला.
हसनैनच्या या कृतीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नातेवाईक व मित्रपरिवाराकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. लहान वयातच धार्मिक कर्तव्याची जाणीव ठेवत त्याने दाखवलेली जिद्द इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.




