
चिखली (ता. कंधार) येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादनाने करण्यात आली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारक पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा गौरव करत त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचा संकल्प व्यक्त केला.


कार्यक्रमास राणाप्रताप पवळे चिखलीकर ( वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण)
डॉ, गणेश पवळे ,भरत कदम , विलास गिरी (ता. अध्यक्ष ). शाहीर किसन पारडे अजय पारडे,
अर्जुन कांबळे. सटवाजी गायकवाड. व्यंकटी कांबळे,पापन पवळे, विश्वंभर पवळे ,मनोहर गायकवाड , शंकरराव कोंडमंगल,
पांडुरंग पुयड, व्यंकटी पवळे
,काळोजी पवळे , भावी सरपंच नामदेव पवळे,
अनिल कांबळे,नागन पारडे आदी सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात शिवगर्जना, घोषणाबाजी आणि एकात्मतेचा संदेश देत जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.