
नांदेड प्रतिनिधी :सूर्यकांत वाघमारे बारूळकर.
कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे उघडकीस आलेल्या संशयास्पद जन्मनोंद प्रकरणाला आता ठोस वळण मिळाले आहे. उस्माननगर पोलिसांनी थेट रांची (झारखंड) येथे धाड टाकत चार पुरुष व एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे बनावट जन्मनोंदींच्या साखळीचा महत्त्वाचा द्वा पोलिसांच्या हाती लागला आहे.
प्रमाणिकपणे चौकशी करण्याचे आवाहन
सध्या आरोपींची सखोल चौकशी सुरू असून या रॅकेटचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील इतर गावांमध्येही अशाच प्रकारे नोंदी वाढल्या आहेत का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
देशात आणि महाराष्ट्रात शासनाची वेबसाईट हॅक मोठ्या प्रमाणात बनावट जन्मनोंदीं करण्याचा गैरप्रकार झाल्याची चर्चा सुरू असतानाच कंधार तालुक्यातील सावळेश्वर गावाचेही नाव यात पुढे आले. केवळ सोळाशे लोकसंख्येचे गाव असलेल्या सावळेश्वरमध्ये अवघ्या सहा
महिन्यांत तब्बल १५ हजार ५७० जन्मनोंदी वाढल्याचे समोर आल्याने प्रशासनही हादरले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला त्याच्या तक्रारी नंतर तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली