
मुदखेड / प्रतिनिधी : प्रकाश गवारे
१ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या भीमा कोरेगांव ऐतिहासिक लढ्याच्या शौर्य दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल मुदखेड तालुका यांच्या वतीने सम्राट अशोका बुद्ध विहार, भिम नगर, मेंडका येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथमता पंचशील धोज्याचे धोजारोहण करण्यात आले आहे.त्या नंतर विजयी स्तंभला पुष्पहार अर्पण करण्यात आला व समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली त्या नंतर
या कार्यक्रमात भीमा कोरेगांवच्या लढाईतील महापराक्रमी ५०० शूरवीरांना व त्यांच्या शौर्याला त्रिवार वंदन करण्यात आले.

यावेळी विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमात समता सैनिक दलाचे प्रशिक्षण सत्र पार पडले. या प्रशिक्षणासाठी सुनील चौदंते व देवराव चौदंते (माजी सैनिक) यांनी सैनिकांना शिस्त, परेड व संघटनात्मक कार्याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा मुदखेड तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मेंडका येथील उपासक -उपाशिका व लहान बालक- बालीका मोठ्या संख्येने उपस्थित होते. “शौर्य दिवस चिरायू होवो” अशा घोषणांनी परिसर भारावून गेला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलास २० मार्च २०२७ रोजी १०० वर्षे पूर्ण होत असून, त्या अनुषंगाने “गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक” या संकल्पनेनुसार राज्यभर सैनिक घडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरे व साप्ताहिक परेडचे आयोजन केले जात आहे.
या वेळी उपस्थितांनी सामाजिक समानता, न्याय व अत्याचारित घटकांच्या संरक्षणासाठी समता सैनिक दलाचे कार्य अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. भंतेजी गगन बौध्दी यांनी त्रिसरणासह पंचशील देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आहे.
“संविधान के सन्मान में, समता सैनिक दल मैदान में!”
