जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
जालना: मंठा तालुक्यातील वैद्य वडगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अज्ञात समाजकंटका कडून अनाधिकृत ध्वज लावण्यात आला होता.
याप्रकरणी १८-१९ दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे जालना तालुक्यातील ठेवली येथील पोलिस ठाण्यावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला यावेळी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वैद्य वडगांव येथील अज्ञात समाजकंटकावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
या प्रमुख मागणीचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी गौतम मगर दिलीप मगर बाबासाहेब मगर संदीप मगर माणिकराव मगर दिलीप दत्तराव मगरविश्वनाथ मगर योगेश उघडे रमेश उघडे शरद मगर कृष्णा मगर प्रकाश सदर बबन मगर गुलाब मगर अशोक मगर, गणेश खरात दत्ता खाडे, मुकुंद काळे, एकनाथ दसरथ डोके, समाधान डोके, सम्यक डोके,मदन डोके त्रिरत्न डोके, किरण डोके, रमेश डोके, मिलिंद डोके , सम्यक डोके,अशीस मोरे, सुमेध मोरे, प्रल्हाद पालवे शत्रूज्ञ कोळी, प्रसाद सदावर्ते यांच्या सह शेकडो महिलांसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

