
दामड (ता. अर्धापूर, जि. नांदेड):
पोर्णिमा पर्वानिमित्त महाविहार बावरीनगर, दामड येथे दि. २३ डिसेंबर २०२५ पासून दहादिवसीय भव्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हे शिबिर पार पडणार आहे.
दहादिवसीय भव्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिराची माहिती
आपणास कळविण्यात विशेष आनंद होतो की, महाविहार बावरीनगर, दाभड, ता. अर्धापूर, जि. नांदेड येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दहादिवसीय भव्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्देश बुद्ध धम्माची शिकवण, शिस्त व संस्कृती भावी पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे.
तरी सर्व धम्मबांधवांनी आपल्या मुलांना या शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रेरणा द्यावी तसेच तरुणांनी स्वप्रेरणेने या शिबिरात सहभागी होऊन बुद्ध धम्माची संस्कृती सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
https://youtu.be/56UwaZfw3aU?si=BwmO4NsZd8ydnjW1
या शिबिरासाठी मार्गदर्शन लाभणार आहे-
पू. भिक्खू धम्मसेवक महाथेरो (मुळावा),
पू. भिक्खू प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो,
पू. भिक्खू प्रा. डॉ. एम. सत्यपाल महाथेरो,
पू. भिक्खू विनय बोधीप्रिय महाथेरो,
पू. भिक्खू पय्यारत्न थेरो,
पू. भिक्खू अस्सजी थेरो,
पू. भिक्खू शीलरत्न थेरो,
पू. भिक्खू संघपाल थेरो,
पू. भिक्खू रेवतबोधी थेरो,
पू. भिक्खू बुद्धभूषण,
पू. भंते संघपाल,
पू. भिक्खुनी चारुशिला थेरी,
तसेच श्रामणेर संघ व श्रामनेरी संघ.
शिबिरासाठी नियम व अटी :
1. सहभागी मुलांची वयोमर्यादा १८ वर्षांपासून पुढे राहील.
2. शिबिराच्या कालावधीत मोबाईल वापरण्यास मनाई असेल.
3. पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.
4. धम्मविनयानुसार चीवर घेणारा उमेदवार निरोगी व सर्वांगाने सक्षम असणे आवश्यक आहे.
5. सहभागी विद्यार्थ्यांनी वही, पेन, अंथरुण, पांघरूण, टूथब्रश, पेस्ट, शेव्हिंग साहित्य, चप्पल, आवश्यक औषधे व टॉवेल सोबत आणावा.
6. येताना दाढी, डोक्याचे मुंडन व हात-पायांची नखे काढून यावीत. कंबरेचा करदोडा, हातातील कडे, ताईत, मणी, दोरे तसेच मोबाईल घरीच ठेवावा.
7. ज्या उपासकांना श्रामणेर संघासाठी नाश्ता, फराळ किंवा भोजन देण्याची इच्छा असेल, त्यांनी अगोदर विहारात नोंद करावी.
8. शिबिरादरम्यान सर्व नियम व अटी तसेच धम्मविनयाचे पालन करणे अनिवार्य राहील.
आधिक माहितीसाठी संपर्क : 8605890637
आयोजक : डॉ. एस. पी. गायकवाड
मोबाईल : 8605890637
