पूर्णत भीषण अपघात घोडज येथील पायी जाणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू


पूर्णा-झिरो फाटा मार्गावर झाला अपघात अज्ञात वाहनचालक वाहनांसह फरार

बातमी दार रुपेश कांबळे, कंधार:- कंधार तालुक्यातील घोडज येथील चंद्रकांत बाबाराव घोडजकर हे मजदूर असून त्यांना आई,भाऊ, बहीण असा परिवार आहे. या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी गावात दैनंदिन रोजगार उपलब्ध होत नसल्याने ते दैनंदिन रोजगार मिळवण्याच्या शोधात, ठेकेदार माधव दिगंबर चव्हाण यांच्या सोबत बिहारला मंदिराच्या कामाला गेला होता. बिहारहून ठेकेदारा सोबत घरी वापस येत होता.

पूर्णेहून झिरो फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गायकवाड यांच्या पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी दि.५/१२/२०२५ सकाळी ७:३० ते ८:०० सुमारास एका भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पायी जाणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. चंद्रकांत उर्फ छकण बाबाराव घोडजकर रा. घोडज, ता. कंधार, जि. नांदेड वय 30 वर्ष असे मृत युवकाचे नाव आहे. अपघात इतका भीषण होता की तरुणाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. धडक दिल्यानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे बिट जमादार अमर चाऊस यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णा-झिरोफाटा मार्गावरील देगाव फाट्यानजीक असलेल्या पेट्रोल पंप परिसरातून चंद्रकांत बाबाराव घोडजकर हे सकाळी पायी

 

चालत जात होते. त्याचवेळी एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक देऊन चाकाखाली चिरडले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक फरार झाला. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. मृताची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती प्रसारित करण्यात आली. काही तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी चंद्रकांत घोडजकर यांची ओळख पटली. पोलिसांनी मृतदेह


Leave a Comment

error: Content is protected !!