
दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून शिरड शहापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *जिल्हाध्यक्ष मा. अनिल कांबळे* होते. त्यांनी आपल्या भाषणात *भारतीय संविधानाचे महत्व, सामाजिक न्याय आणि बंधुता या मूल्यांची आठवण करून देत* युवकांनी संविधानाचे मूल्य आत्मसात करावे, असे आवाहन केले.
या प्रसंगी *समता दूत सुकेश कांबळे*, *जयदीप राठोड सर*, *आनंद ढेंबरे*, *अनिल गायकवाड*, *नितीन खेबाळे*, *पी. एम. कांबळे*, *जयराम सूर्यतळ*, *हनीफ पठाण*, *अशिफ रजा*, *गजानन रावले*, *सागर रावले*, *दीपक सूर्यतळ*, *दुधाची ढेंबरे, शिवाजी जोगदंड सय्यद मोसिन सय्यद गुड्डू*यशवंत कांबळे *शालेय विद्यार्थी* व *ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित* होते.
कार्यक्रमाचे संयोजन शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने पार पडले. संविधान दिनाचे हे सामूहिक आयोजन हे सामाजिक ऐक्य व संविधान मूल्यमान्यतेचे प्रतीक ठरले.