मौजे उस्माननगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उभारणी व अभिवादन कार्यक्रम उत्साहात


ता. कंधार,उस्माननगर

दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मौजे उस्माननगर (ता. कंधार, जि. नांदेड) येथे विश्वरत्न, परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला.

यानंतर दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता, तपोवन बुद्धभूमी, गोळेगाव येथे पुज्य भंते बोधी धम्मो यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना त्रिसरण व पंचशील दिले.

या कार्यक्रमाला गोळेगाव, शिराढोण, कापशी, उस्माननगर तसेच परिसरातील सद्भावान बौद्ध उपासक व नवतरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण होते.


Leave a Comment

error: Content is protected !!