कळमनुरी अल्पवयीन मुलांना RSS मार्फत धार्मिक प्रशिक्षण – नारायणा पब्लिक स्कूलवर कारवाईची मागणी,8 दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन.




कळमनुरी : दि. 04 नोव्हेंबर 2025कळमनुरी शहरातील सेट नारायणदास सोमाणी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नारायणा पब्लिक स्कूल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या राजकीय व धार्मिक स्वरूपाच्या संघटनेमार्फत अल्पवयीन मुलांना धार्मिक व जातीवादी प्रशिक्षण देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी, कळमनुरी तालुका यांच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रारीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, दिनांक 28 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सदर शाळेमध्ये वय वर्ष 13 ते 23 वयोगटातील अल्पवयीन मुलांना धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास कोणतीही अधिकृत परवानगी न घेता ते राबविण्यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

घटनास्थळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भेट दिली असता पोलिस प्रशासनालाही घटनास्थळी बोलावण्यात आले आणि प्रशिक्षण सुरू असल्याचे उघड झाले.

या संदर्भात संघटनेने प्रशासनाकडे खालील मुख्य मागण्या केल्या आहेत :

संबंधित शाळेचा परवाना तत्काळ रद्द करावा.

महाराष्ट्र खाजगी शाळा नियमानुसार कोणत्याही शाळेत खाजगी किंवा शासकीय शाळा किंवा संस्था असतील त्यावर राज्य शिक्षण मंडळाचे नियम (महाराष्ट्र शालेय शिक्षण ) नियमनुसार फक्त शैक्षणिक उपक्रमच राबवू शकतात.धार्मिक व संघटनात्मक शिबिर असल्यामुळे त्यांच्यावर बंदी आहे,विद्यार्थ्यांवर मानसिक किंवा धार्मिक दबाव आणणे हा शिस्तभंग करून बेकायदेशीरपणा आहे.

भारतामध्ये खाजगी शाळा या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 ( RTE ACT 2009) राज्य शिक्षण नियम आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण ( NEP 2020 ) यांच्या कक्षेत येतात त्यामध्ये स्पष्ट नमूद आहे, की शाळा धार्मिक जाती किंवा राजकीय प्रचारासाठी वापरता येणार नाही. यामुळे संबंधित शाळेचे संचालक, मुख्याध्यापक व प्रशिक्षण देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी.

या प्रशिक्षणास शिक्षण विभाग अथवा पोलिसांची परवानगी होती का, याची चौकशी करण्यात यावी.

अल्पवयीन बालकांवर मानसिक धार्मिक किंवा राजकीय दबावांनी कोणत्याही संघटनेचे नावाखाली बालकांच्या विचारसरणीसाठी उपयोग करणे बालहक्क संरक्षण कायदा, शिक्षणाचा अधिकार कायदा 2009, महाराष्ट्र शिक्षण अधिनियम आणि राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तरतुदींनुसार संबंधित संस्थेवर गुन्हा नोंदवावा.

तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेने अलीकडेच “कळमनुरी” या शहराचे नाव बदलून “कदंबनगरी” या नावाने मोठी मिरवणूक काढल्याचे आणि त्यातून हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यामध्ये शिक्षणाचा अधिकार कायदा,भारतीय राज्यघटना, महाराष्ट्र खाजगी शाळानियम,बालहक्क संरक्षण कायदा या सर्व नियमांचे उल्लंघन केले असून त्वरित संबंधितावर कारवाई करावी.

वंचित बहुजन आघाडीच्या वतनी प्रशासनाला ८ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी हिंगोली वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अनिल कांबळे (जि.अ हिंगोली), ज्योतिपाल रणवीर (जि.महासचिव),कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे,प्रवीण थोरात (जी.सहसचिव),मोहम्मद अस्लम (युवा ता.अध्यक्ष),
यशवंत नरवाडे ( ज्येष्ठ कार्यकर्ते),शकील पठाण (शहर अध्यक्ष),संतोष इंगोले ( युवा ता.महासचिव) ,जयभीम डोंगरे (युवा ता.सचिव)
,प्रश्नात चोपडे ( संमेक वी.आ. ता.अ),दादाराव खंदारे, ,समाधान पाईकराव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Comment

error: Content is protected !!