
ता.कळमनुरी 14 नोव्हेंबर 2025 रोजी आदरणीय मा. सुजातभाऊ आंबेडकर यांची कळमनुरी येथे जाहीर सभा…!
कळमनुरी तालुक्याच्या वतीने शासकीय विश्रामगृह कळमनुरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये येत्या 14 नोव्हेंबर 2025 रोजी आदरणीय मा. सुजातभाऊ आंबेडकर यांची कळमनुरी येथे जाहीर सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले.

येत्या 14 नोव्हेंबर 2015 रोजी आदरणीय मा. सुजातभाऊ आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये कळमनुरी येथे जाहीर सभा असल्याचे वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठरविले व लवकरच समोरील नियोजन देखील ठरवण्यात येईल, अशी माहिती कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी या बैठकीत दिली.

यावेळी कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे,शकील पठाण ( श.अध्यक्ष,कळमनुरी),प्रवीण थोरात (जि.सहसचिव),यशवंत नरवाडे (ज्येष्ठ कार्यकर्ते) ,शिवाजी भूतनर ( ता.उपाध्यक्ष),संतोष इंगोले (युवा ता.महासचिव),जयभीम डोंगरे ( युवा ता.सचिव),प्रश्नात चोपडे ( स. वि.आंदोलन ता.अध्यक्ष),शंकर रणवीर (जेष्ठ कार्यकर्ते) ,करण नरवाडे ( शा.अ.दाती),विनोद ढेपे ( शा.अ.दाती),दादाराव खंदारे ( शा.स.बऊर),भगवान ढेपे (ज्येष्ठ कार्यकर्ते) , काशिनाथ साळवे (ज्येष्ठ कार्यकर्ते),मुकिदा ढेपे (ज्येष्ठ कार्यकर्ते) ,दिनेश पाईकराव ( श.सचिव) दिनेश वाढवे (युवा श.स),बालाजी नरवाडे,गोविंद पाईकराव,निखिल कदम व इतर समस्त कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी, ता.कळमनुरी जि. हिंगोली