वंचित बहुजन आघाडीचा स्वाभिमानी निर्धार मेळावा नांदेड सिडको येथे संपन्न


नांदेड (सिडको) : येथे आज दिनांक 1/11/2025 रोजी वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण महानगर व युवा आघाडी च्या वतीने गुरुकृपा मंगल कार्यलया हडको येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत हडको नांदेड येथे स्वाभिमानी निर्धार मेळावा पार पडला. वंचित बहुजन आघाडीने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार केला असून, आगामी सत्ता स्वाभिमानाने काबीज करण्याचे सुतोवाच सुजात आंबेडकर यांनी या वेळी केले.

 

वंचित बहुजन आघाडीच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवून आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते सम्राट अशोक आढाव यांनी युवा नेता सुजात आंबेडकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद, युवा आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य अक्षय बनसोडे, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, इंजि. प्रशांत इंगोले महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड,जिल्हा महासचिव श्याम कांबळे, महासचिव अमृत नरंगलकर, गोपालसिंग टाक सिधोधन कापशीकर,भीमराव बेंद्रीकर, सुरेश गजभारे, रवी पंडित,विनायक गजभारे,सम्राट आढाव, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. या मेळावा यशस्वीकरण्यासाठी साहेबराव भंडारे,अनिल बेरजे, शिवाजी कांबळे, राघोजी वाघमारे, गौतम ढुंमणे,राजू जमदाडे, बालाजी ढवळे, नंदकुमार गच्चे, विजय भंडारे, साहेबराव ढवळे, सुरेश पवळे, प्रदीप जोगदंड,नितीन जोंधळे, अमरदीप हरणावले, आदींनी प्रयत्न केले.


Leave a Comment

error: Content is protected !!