
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या चर्चा दौऱ्याला अकोला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
सुजात आंबेडकर म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका जिंकून सत्तेत जाण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे.”
📍 दौरा स्थळे:
बोरगाव मजू / कानशिवणी सर्कल
हातगाव / कानडी सर्कल
कुरूम / माना सर्कल
मुतीजापूर नगरपालिका — जाहीर सभा
या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नातीकोद्दीन खतीब, युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सुजात आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, “बूथ बांधणी करून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचा. त्यांना वंचित बहुजन आघाडीचे ध्येय व धोरण समजावून सांगा.”
भाजपवर टीका करत त्यांनी म्हटले की, “भाजपने विकासाच्या सर्व योजना फक्त कागदावर दाखवल्या आहेत. पाणी प्रश्न, कचरा समस्या, भूमिगत नाले – कोणतीच समस्या सुटलेली नाही. मात्र, या योजनांसाठीचा निधी मात्र लुटला गेला आहे.”
स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच पर्याय असल्याचे सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोंगरे, महासचिव राजकुमार दामोदर, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.