गुन्हे मागे घेतले नाहीत, तर आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा!” — अमित भुईगळ यांचा इशारा


औरंगाबाद — शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या आरएसएसच्या नोंदणी मोहिमेला विरोध करणाऱ्या वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे यांच्यावर पोलिसांनी अजामीनपात्र आणि गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन, आरएसएसच्या बेकायदेशीर नोंदणीला विरोध केल्यामुळे दाखल करण्यात आलेले हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.

पक्षाचे नेते अमित भुईगळ यांनी सांगितले की, “आरएसएस ही वंचित बहुजन आघाडीच्या आंबेडकरवादी विचारसरणीला घाबरते. आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांनीही संघाला ठामपणे विरोध केला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “जर पोलिस प्रशासनाने राहुल मकासरे आणि विजय वाहूळ यांच्यावरील गुन्हे मागे घेतले नाहीत, तर वंचित बहुजन आघाडी थेट आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढेल.”


Leave a Comment

error: Content is protected !!