शहरातील कायदा, सुव्यवस्था, वाढत्या गुन्हेगारी वर कारवाई करा – नांदेड वंचितच्या निवेदनाद्वारे मागणी


नांदेड : मागील काय दिवसापासून चालत असलेल्या नांदेड शहरातील गॅंगवार मर्डर यासारख्या घटना घडत असून नांदेड शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत, वाढत्या गुन्हेगारीवर तसेच काळ्या काचा (ब्लॅक फिल्म) असलेल्या वाहनांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सद्यस्थितीला नांदेड शहरातील सध्याची कायदा व सुव्यवस्था अत्यंत चिंताजनक बनली असून गुन्हेगारीने कळस गाठला आहे. शहरातील नागरिक, व्यापारी तसेच विद्यार्थीवर्ग भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत. त्या गंभीर बाबी शासनाच्या निदर्शनास आणून देण्याच्या दृष्टिकोनातून वंचित ने हा पुढाकार घेतला आहे.१) अल्प कालावधीत वाढलेली खून व गुन्हेगारी नुकत्याच ७० तासांत ५ खून झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.शहरात अल्पवयीन मुलांच्या गॅंग तयार होत असून गुन्हेगारीत त्यांचा सहभाग वाढत आहे.अनेक गँगस्टर जेलमध्ये राहून बाहेरच्या टोळ्यांचे संचालन करत आहेत.टोळी युद्धामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.२). काळ्या काचा (ब्लॅक फिल्म) असलेल्या वाहनांचा वाढता वावर शहरात चारचाकी वाहनांवर बेकायदेशीररीत्या काळ्या काचा लावून सर्रास वावर केला जात आहे.विशेषतः रात्री ९.३० नंतर अशा वाहनांचे प्रमाण वाढते.या वाहनांमधील व्यक्ती ओळखणे अशक्य होत असल्याने गुन्हेगारीला चालना मिळते.पोलीसांच्या समोरून नियमभंग होत असतानाही कारवाई होत नाही. हा प्रकार थेट कायद्याचे उल्लंघन असून सार्वजनिक सुरक्षेस गंभीर धोका आहे.संबंधित कायदेशीर तरतुदी :भारत सरकारचा मोटार वाहन कायदा,१९८८ तसेच Central Motor Vehicles Rules, १९८९ मधील नियम १०० नुसार वाहनांच्या काचांवर मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या आहेत.तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांवर बाह्यरित्या लावलेली काळी फिल्म पूर्णपणे बंदीस्त आहे.समोरील काच : किमान ७०% दृश्यता असावी.बाजूच्या काचा : किमान ५०% दृश्यता असावे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे बंधनकारक आहे.जर नाही केल्यास यामुळे शिक्षण व अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.
नांदेड शहर हे शैक्षणिक दृष्ट्या प्रगत शहर असून महाराष्ट्राच्या विविध भागांतून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात.इयत्ता ११वी-१२वी तसेच NEET, JEE सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शहरात येतात.परंतु वाढत्या गुन्हेगारीमुळे विद्यार्थ्यांच्या येण्याचे प्रमाण घटले आहे.पालकांमध्ये भीती निर्माण झाल्यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे. एवढेच नाही तर याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर लहान व्यवसायांवर गुंतवणुकीवर
शहराच्या आर्थिक घडीवर होत आहे.इतर गंभीर समस्या :
अवैध गुटखा, दारू, मटका, वाळू तस्करी, वेश्याव्यवसाय
लूटमार, पाकिटमारी, शस्त्राच्या धाकावर गुन्हे,गांजा सेवन करून प्रवाशांना धमकावणे
बेरोजगारीमुळे तरुणांचा गुन्हेगारीकडे ओढा वाहतूक नियमांचे उल्लंघन (ट्रिपल सीट)
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
मागण्या : काळ्या काचा असलेल्या वाहनांवर तात्काळ विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई व जप्ती करावी.
शहरातील सर्व गँग व टोळ्यांवर कठोर कारवाई करून मुख्य आरोपींना तात्काळ अटक करावी.जेलमधून चालणाऱ्या गुन्हेगारी नेटवर्कवर बंदी घालावी.रात्रीच्या वेळी कडक नाकाबंदी व पोलीस गस्त वाढवावी.सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात.शहरातील कायदा व सुव्यवस्था तात्काळ सुधारावी वरील बाबींवर तात्काळ व ठोस कार्यवाही करण्यात यावी, या मागणीवर त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक यानी दिले आहे अशी माहीती जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी दिली आहे. या नंतर ही कार्यवाही न झाल्यास पुढील काळात नांदेड शहरातील नागरिक, व्यापारी व विद्यार्थी यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाविरोधात भव्य विराट मोर्चा काढण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.आपण या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन कठोर व प्रभावी उपाययोजना कराव्यात असे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तर इंजि. राज अटकोरे, नांदेड दक्षिणचे जिल्हा जिल्हाध्यक्ष शंकर महाजन व पदाधिकारी यांनी हे सर्व मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून मांडले आहेत.


Leave a Comment

error: Content is protected !!