
माळेगाव:माळेगाव यात्रेच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांच्या सुरक्षितता, सोयीसुविधा व सुव्यवस्थेसाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे आज पाहायला मिळाले.
जिल्हाधिकारी माननीय राहुल कर्डीले साहेब, पोलिस अधीक्षक माननीय अविनाशकुमार साहेब तसेच कंधार विभागाच्या DYSP माननीय अश्विनी जगताप मॅडम , उपविभागीय अधिकारी विलास नरवटे साहेब यांनी यात्रास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत संपूर्ण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी वाहतूक व्यवस्थापन, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता, आरोग्य सुविधा, आपत्कालीन सेवा, वीज पुरवठा तसेच भाविकांच्या सुरक्षित हालचालींसाठीचे नियोजन या सर्व बाबींची बारकाईने तपासणी करण्यात आली.
कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने सतर्कता बाळगून आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होऊ नये, गर्दीचे योग्य नियोजन व्हावे आणि यात्रेचा अनुभव सुरक्षित व सुखद राहावा यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा व स्थानिक यंत्रणांमध्ये उत्कृष्ट समन्वय साधण्यात आला आहे.
माळेगाव यात्रेचे पवित्र महत्त्व लक्षात घेता, “भाविकांची सेवा हाच खरा धर्म” या भावनेतून प्रशासन अहोरात्र कार्यरत असून, या नियोजनाबद्दल भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.