
ता. परतूर प्रतिनिधी दिपक नाटभजन
जालना, दि. १० नोव्हेंबर २०२५ (सोमवार) रोजी
ओबीसी भटके मुक्त महासंघाच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा जालना येथे काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

मोर्चात मोठ्या संख्येने ओबीसी समाजातील बांधव, महिला आणि युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

वंचित बहुजन आघाडीचा विजय,उठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच,प्रकाश आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,
एकच पर्व ओबीसी सर्व “ओबीसी आरक्षण आमचा हक्क आहे”,ओबीसी भाई जागेगा चोर लुटेरा भागेगा, “संविधान जिंदाबाद”, “वंचित बहुजन आघाडीचा विजय असो” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी हक्कासाठी जोरदार ऐक्य दाखवले.
या प्रसंगी सविता ताई मुंडे राष्ट्रीय सदस्य,डेविड दादा घुमारे जालना पश्चिम जिल्हा अध्यक्ष, रामप्रसाद थोरात जालना पुर्व जिल्हा अध्यक्ष, प्रशांत कजबे जिल्हा महासचिव, डॉ त्रिभवन जिल्हा महासचिव,युवा जिल्हा अध्यक्ष विजय लाहने, जालना तालुका अध्यक्ष भानुदास रवी भदर्गे ता. अध्यक्ष साळवे मोर्चा मध्ये अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते