शिवाजी पार्कवर २५ नोव्हेंबरला ‘संविधान सन्मान महासभा’; बाळासाहेब आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती


मुंबई: भारतीय संविधानाच्या गौरवशाली मूल्यांचे जतन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने येत्या २५ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भव्य ‘संविधान सन्मान महासभेचे’ आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे.

 

या महासभेचा मुख्य नारा —

“देश संविधानाने चालेल, मनुवादाने नाही” — असा देण्यात आला असून, समाजात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या घटकांना बळ देण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.

 

याबाबत वंचित बहुजन आघाडीचे पनवेल उपाध्यक्ष शशिकांत कळवेकर (कुंभार) यांनी नागरिक, संविधानप्रेमी, कार्यकर्ते आणि युवकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संविधान रक्षणाची प्रेरणा आणि सामाजिक न्यायाची ज्योत अधिक प्रखर करण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमात ॲड. बाळासाहेब आंबेडकर संविधानाचे महत्व, सद्य सामाजिक-राजकीय परिस्थिती आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. विविध जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि समर्थक हजेरी लावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!