*श्री बाबीर विद्यालय, रुई व जे के क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा मार्गदर्शन शिबिर संपन्न


प्रतिनिधी सागर लोंढे

रुई, दि. 2 मे:* श्री बाबीर विद्यालय रुई व जे के क्रीडा प्रबोधिनी शेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 एप्रिल ते 1 मे 2026 या कालावधीत निवड चाचणी व खो-खो तसेच मैदानी खेळांचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात 60 खेळाडूंनी सहभाग घेतला.

शिबिरादरम्यान जे के क्रीडा प्रबोधिनीचे संस्थापक कैलास जाधव सर यांनी खेळाडूंना खो-खो व मैदानी खेळांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. खेळाचे नियम, तंत्र व डावपेच याबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

शेवटच्या दिवशी घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंना प्रथम तीन क्रमांकासाठी मेडल व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पर्यवेक्षक धनाजी गावडे यांचे चिरंजीव डॉ.ऋषिकेश धनाजी गावडे यांची रांची या ठिकाणी असलेल्या अजीम प्रेमजी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक या पदासाठी निवड झाल्याने या संस्थेचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील व रुई गावचे पोलीस पाटील अजित सिंह पाटील व विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते डॉ.ऋषिकेश गावडे यांचा बुके, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कृषिकेश यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये कशा पद्धतीने शिकले पाहीजे आणि स्पर्धेच्या युगात कसे टिकले पाहीजे अशी उपयुक्त सखोल माहिती सांगितली.

यावेळी क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभास अजितसिंह पाटील पोलीस पाटील, श्री बाबीर विद्यालय रुईचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील, पर्यवेक्षक धनाजी गावडे, शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रेय काळे , पालक, खेळाडू व जे के क्रीडा प्रबोधिनीचे संस्थापक कैलास जाधव सर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे व त्यांनी जिल्हा, राज्य पातळीवर नावलौकिक करावा या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक होत आहे.


Leave a Comment

error: Content is protected !!