
उस्माननगर, ता. कंधार, जि. नांदेड – प्रतिनिधी
मौजे उस्माननगर येथे ६ डिसेंबर २०२५ रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी भीमअनुयायांची उत्स्फूर्त गर्दी झाली. पहाटेपासूनच भाविकांची वर्दळ वाढत गेली आणि संपूर्ण परिसर आंबेडकरी विचारांनी, श्रद्धेने व भक्तिभावाने भारून गेला.
कर्यक्रमाची सुरवात
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून बुद्ध वंदना आणि गाथा घेऊन वंदन केले व उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. उपासक–उपासिका, महिला, युवक, बालक–बालिका तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. शांतता, शिस्त आणि “समता–बंधुता–न्याय” या बाबासाहेबांच्या मूल्यांचे सामूहिक स्मरण करत उपस्थितांनी सामाजिक ऐक्याचा प्रभावी संदेश दिला.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व नागवंश मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. दिवसभर विविध मार्गदर्शनपर कार्यक्रम, प्रबोधनपर व्याख्याने आणि स्मरण सोहळे पार पडले. गावातील पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष ऊर्जित वातावरण मिळाले.
महामानवांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी गावातील नागरिकांनी धम्मादानातून मोलाचे योगदान दिले. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या सौ. मिनाबाई चंद्रकांत कांबळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन हे धम्मादान थेट स्मारक समितीकडे सुपूर्द केले, ज्यामुळे उपस्थितांमधून त्यांच्या कार्याची प्रशंसा झाली.

भाग्यश्री अरविंद कांबळे,
प्रज्ञा प्रशांत डांन्स,रोहिणी प्रफुल्ल कांबळे यांच्या परिवारा कडून
धम्मादानातून स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत सामाजिक कार्य केले

संपूर्ण उस्माननगर मधील नागवंश मित्र मंडळ यांच्या सहकार्यामुळे महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम अत्यंत भव्य, शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने पार पडला. डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती असलेली कृतज्ञता, आदर आणि निष्ठा याची पुनःप्रत्ययकारी साक्ष या कार्यक्रमातून प्रकर्षाने दिसून आल