आज घोडज येथे मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा करण्यात आला.


कंधार (घोडज )

उद्धव पाटील लाडेकर यांच्या राहत्या घरी दिवाळी सण निमित्त लक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी घरातील सर्व सदस्य महिला मंडळ बालक व बालिका, मुलं, मुली, जावई, मोठा परिवार तसेच गावातील सर्व कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. लक्ष्मी पूजन करतेवेळी, घरातील ज्येष्ठ व्यक्ती माजी सरपंच भगवानराव पाटील लाडेकर, माधव पाटील लाडेकर,माजी उपसरपंच उद्धव पाटील लाडेकर, केशव पाटील लाडेकर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, माजी सरपंच नागोराव पाटील लाडेकर, नारायण पाटील चोंडे, आत्माराम पाटील लाडेकर, दिलीप पाटील लाडेकर, श्रीनिवास मोरे सर, ज्ञानेश्वर ढगे साहेब, गणपत पाटील लाडेकर, दत्तात्रेय लाडेकर साहेब,परविन लाडेकर सर, मनोज पाटील लाडेकर , पवन लाडेकर, पृथ्वी लाडेकर,ग्रामपंचायत सदस्य आनंदराव टोकलवाड, खंडू सोनकांबळे,सुनील घोडजकर सर्व गावकरी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित होते.

दिवाळी सणानिमित्त उद्धव पाटील यांच्या परिवाराच्या वतीने सर्व गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना,कष्टकऱ्यांना, कामगारांना हि दिवाळी सुख समृद्धी मध्ये जावे अशी सदिच्छा परमेश्वराकडे व्यक्त केली. यावर्षी शेतकरी फार संकटात सापडला आहे. त्यांचे संकट दूर व्हावे. हे वर्ष सर्वांना प्रगतीमय सुखमय जावो,अशी प्रार्थना केली. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. त्यांच्या परिवारातील व्यक्तीने पण दिपवाळीच्या शुभेच्छा दिल्या.


Leave a Comment

error: Content is protected !!