
नांदेड प्रतिनिधी:सूर्यकांत वाघमारे
येथील मजूर लालोंडी तालुका नायगाव येथे कामासाठी जात असताना हळदा _ कोलंबी दरम्यान मोटरसायकलचा अपघात होऊन दोन युवक गंभीर झाले होते त्यांना तातडीने विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण रुग्णालय येथे उपचारासाठी दाख ल करण्यात आले होते. त्यातील एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एकाचे हात फॅक्चर झाले आहे.
सविस्तर माहिती अशी की, बारूळ तालुका कंधार येथील मजुरी करणारे कुटुंब सोयाबीनची सुगी करण्यासाठी नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे जात असताना ज्ञानेश्वर विलास जाधव (21) व कोंडीबा किशन जाधव ( 20) दिनांक 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान मोटारसायकल वरून जात असताना हळदा _कोलंबी दरम्यान मोटरसायकलचा अपघात झाला दोघेही गंभीर जखमी झाले होते त्यांना विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डोक्याला गंभीर दुखापत झालेले ज्ञानेश्वर विलास जाधव यांचे दिनांक २० ऑक्टोबर रोजी पहाटे मृत्यू झाला व कोंडीबा यांचा हात फॅक्चर झाला असून किरकोळ मारू लागला आहे.
अविवाहित युवकांच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा आधार नाहीसा झाला असून या घटनेचे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रस्ते अपघात होऊन मृत्यू पावल्यामुळे शासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे