कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव
कल्याण : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ANNI Foundation यांच्या वतीने मोफत तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० या वेळेत कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात, रेल्वे तिकीट ऑफिसच्या बाजूला आयोजित करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांसाठी शुगर तपासणी, बीपी तपासणी, पल्स तपासणी तसेच डोळ्यांची तपासणी मोफत करण्यात येणार असून, गरजू रुग्णांना चष्मेही अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या उपक्रमाचे रिपब्लिकन रिक्षा / टॅक्सी चालक मालक संघटना संस्थापक अध्यक्ष मा.प्रल्हादजी जाधव व कल्याण शहर अध्यक्ष मा. मोहन पठारे आयोजन ANNI Foundation चे संचालक समीर सत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, सचिन जोशी, रविंद्र पांडे, ऋषिकेश सत्रे आणि लालु आंबेडकर आदींचे सहकार्य लाभले आहे.
सदर शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
