
जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
ता. जालना जि. जालना : ग्रामपंचायत धावेडी/थार
मौजे धावेडी येथे यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाला सरपंच कडूबा प्रकाश पठाडे, ग्रामसेवक अलका डोईफोडे, ग्रामपंचायत अधिकारी किसनराव गायकवाड, शिवाजी साबळे, सुभाष खरात, संजय वानखेडे, बळीराम कवडे, पंडित खरात, श्रीकांत साबळे तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक बांधिलकी, शिक्षण आणि समतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ग्रामस्थांच्या सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत शांत, अनुशासित वातावरणात पार पडला.