
जालना प्रतिनिधी : प्रदीप जाधव
जालना जिल्ह्यातील थार गावात दिवंगत आसराबाई जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला जलदान विधी कार्यक्रम या कार्यक्रमास नातेवाईक, ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी त्रिशरण व पंचशीलाचे सामूहिक पठण करण्यात आले. त्यानंतर जलदान विधी पार पाडून दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आसराबाई जाधव यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक व कौटुंबिक योगदानाचा गौरव केला.

रात्रीच्या वेळी बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या गीतांमधून भगवान बुद्धांचे विचार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण व सुव्यवस्थित वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक कुटुंबीयांच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.
