
विद्यार्थी संघटनांसह सामाजिक,राजकीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग.
नांदेड- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व दिल्लीतील जंतरमंतरच्या आंदोलनास पाठिंबा देत नांदेडमध्ये सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्याशेजारी आय.टी.आय. चौक,नांदेड येथे हम भारत के लोग म्हणून या सत्याग्रह आंदोलनाला आज दि.२५ जुलै रोजी शनिवारी सुरुवात करण्यात आली.
श्याम निलंगेकर,संजय वाघमारे,रोहन कहाळेकर, सचिन पाटील,प्रा.प्रल्हाद इंगोले,काकासाहेब डावरे, शकिला शेख,कोमल सोनाळे,
मकसूद पटेल लोहगांवकर, तरन्नूम मोहम्मद,उज्वला पडलवार, मोइजखान,जईद खान,शुभम इंगोले आदींनी या सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केली आहे.
या आंदोलनाला बसपाचे मनिष कावळे,सुधाकर सरोदे,शिवाजी सोनटक्के, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगांवकर,प्रांजली रावनगांवकर,एनएसयूआयचे गोविंद पाटील,टायगर ग्रुपचे पै.बाळासाहेब जाधव, अँड.प्रदिप नागापूरकर, शिवाजी फुलवळे,अँड.नितीन थोरात,माजी नगरसेवक दुष्यंत सोनाळे,इंजी.सुभाष रावणगांवकर,तातेराव पाटील आलेगांवकर,माजी नगरसेवक प्रकाश मुराळकर, लक्ष्मणराव भवरे,मारोती चिवळीकर,इंजी.भिमराव हटकर,तुषार देशमुख,एस. एफ.आयच्या मिना आरसे, सुनिल सोनसळे, अहाजखान,जिन्नत अफजा,जोया इरम,जुबीया शेख,आयशा खान,सानिया शेख,हुरेन शेख,शेख शहाबुद्दीन,शेख सिराज, मोहम्मद जुबेर, मोहम्मद साद मलिक, इब्राहिम,अफसर अहेमद,मोहम्मद शोएब, साहिल शेख,सय्यद साहिल आदी विद्यार्थी-सामाजिक- राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते,विद्यार्थी यांनी उपस्थित राहून या सत्याग्रह आंदोलनात सहभाग नोंदविला.