इंदापुर रुई येथील ग्रामीण भागातील श्री. बाबीर विद्यालयाचा माजी विद्यार्थी सुमित दगडे याची एम बी बी एस साठी निवड..


प्रतिनिधी:- सागरभाऊ लोंढे 

इंदापूर : सुमित सुनील दगडे हा श्री बाबीर विद्यालयाचा माजी विद्यार्थी त्याची एम बी बी एस साठी निवड झाली आहे त्याचा काल विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील रुई गावचे पोलीस पाटील अजितसिंह पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील, पर्यवेक्षक धनाजी गावडे,ज्येष्ठ शिक्षक सुनील दराडे (यांचा हा आवडता विद्यार्थी), सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद यांच्या वतीने त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या

तसेच रुई पंचक्रोशीत आनंदमय वातावरण तयार झाले या वेळी मिरादेवी पाटील मॅडम यांचा देखील सत्कार घेण्यात आला तसेच मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत शाळकरी मुलांमधे देखील आनंद दिसुन आला.


Leave a Comment

error: Content is protected !!