इंदापूरमध्ये नवा डिजिटल प्रयोग – oolshik ची सुरुवात न्हावी गावातून


प्रतीनिधी:- सागरभाऊ लोंढे 

 

आपल्या परिसरात एखादे छोटे काम आहे, मदत हवी आहे किंवा *एखाद्या कामासाठी अनेक लोकांची एकत्र मदत हवी आहे?* यासाठी *oolshik* हे नवे मोबाईल ॲप आपल्या मदतीला येत आहे.

 

*oolshik च्या पहिल्या पायलटची सुरुवात इंदापूर तालुक्यातील न्हावी गाव आणि आसपासच्या मर्यादित परिसरातून होत आहे.*

 

या उपक्रमामागे न्हावी गावचेच *नितीन पोपट काळोखे* यांची संकल्पना आणि प्रयत्न असून, ग्रामीण भागातील दैनंदिन गरजा आणि एकमेकांना मदत करण्याची संस्कृती आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे.

 

oolshik मध्ये तुम्ही तुमची गरज अगदी सोप्या पद्धतीने *आवाजात सांगू शकता* आणि ती आसपासच्या उपलब्ध लोकांपर्यंत पोहोचवली जाते.

 

एखाद्या व्यक्तीची छोटी मदत असो किंवा *अनेक लोकांची गरज असलेले सामूहिक काम*, oolshik जवळच्या लोकांना एकत्र आणण्यास मदत करते.

 

उदाहरणार्थ – *शेतातील तातडीचे काम, पाणी किंवा सिंचनासाठी पाइपलाइन जोडणे अथवा हलवणे, पावसामुळे अडलेले काम पूर्ण करणे किंवा अचानक उद्भवलेल्या अडचणीच्या वेळी अनेक लोकांची मदत मिळवणे* अशा प्रसंगी याचा उपयोग होऊ शकतो.

 

*oolshik मधून कमाईही करता येते* – काम सांगणारी व्यक्ती त्या कामासाठी देऊ केलेली रक्कम नमूद करते; आसपासची व्यक्ती काम स्वीकारून पूर्ण केल्यावर ती रक्कम मिळवू शकते. कामाच्या स्वरूपानुसार अधिक रक्कम अपेक्षित असल्यास मदत करणारी व्यक्ती वाढीव रकमेची विनंती करू शकते आणि *दोघांच्या परस्पर सहमतीने ठरलेल्या रकमेवर काम करता येते.*

 

त्यामुळे विद्यार्थी, युवक, शेतकरी किंवा इतर कोणीही *आपल्या मोकळ्या वेळेचा* उपयोग करून आसपासची कामे पूर्ण करत अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.

 

“आपल्या परिसरातील गरज – आपल्या परिसरातील मदत” ही oolshik मागची मुख्य कल्पना आहे.

 

न्हावी गावातील नागरिकांच्या अनुभव आणि अभिप्रायाच्या आधारे oolshik अधिक उपयुक्त बनवून पुढे इंदापूरच्या इतर भागांमध्ये विस्तारण्याचा मानस आहे.

 

📱 *oolshik सध्या Android वर उपलब्ध असून, अॅप मराठी भाषेतही वापरता येते | iPhone (iOS) अॅप लवकरच येत आहे.*

 

*oolshik – गरज तुमची, मदत आपल्या जवळची.*

 

*आजच QR Code स्कॅन करा, oolshik डाउनलोड करा आणि न्हावी गावातून सुरू होणाऱ्या या नव्या प्रयोगाचा भाग बना!*


Leave a Comment

error: Content is protected !!