
सेवानिवृत्त शिक्षक हनुमंत जगताप सरांचाही केला सन्मान; दोन्ही शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
इंदापूर प्रतिनिधी :-सागरभाऊ लोंढे (उपसंपादक)
कालठण नं. १ : श्री काळभैरवनाथ विद्यालय, कळाशी येथील शिक्षक तथा कालठण नं. १चे सुपुत्र श्री. दत्तात्रय दिनकर गायकवाड सर यांना “एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना आदर्श शिक्षक पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल पतंजली योग परिवार, कालठण नं. १ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गायकवाड सरांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पतंजली योग परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे कालठण नं. १ गावाचा तसेच परिसराचा नावलौकिक वाढला असून, त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी उत्कर्ष विद्यामंदिर, कालठण नं. १ येथील शिक्षक श्री. हनुमंत जगताप सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचाही पतंजली योग परिवार, कालठण नं. १ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. दीर्घकाळ शिक्षण क्षेत्रात सेवा बजावत विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार व मार्गदर्शन देणाऱ्या जगताप सरांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव यावेळी करण्यात आला.
शिक्षक हे समाज घडविण्याचे महत्त्वाचे माध्यम असून, त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे. या भावनेतून दोन्ही शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. श्री. दत्तात्रय गायकवाड सर आणि श्री. हनुमंत जगताप सर यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पतंजली योग परिवाराच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.