रवि पंडित तुप्पेकर यांना छत्रपती शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार 2026 जाहीर.


===================

छत्रपती शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार हा अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार रवि पंडित तुप्पेकर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.

मागील वीस वर्षापासून सातत्याने व सक्रियपणे सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये भारीव आस योगदान देणारे रवि पंडित तुप्पेकर यांना छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार- 2026 जाहीर करण्यात आलेला आहे. तेव्हा रवि पंडित यांनी मागील अनेक वर्षापासून सातत्याने राष्ट्रीय उपक्रम म्हणून भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर यासह अनेक महापुरुषाच्या, महामानवांच्या जयंतीदिनी विविध समाज उपयोगी उपक्रम म्हणून समाज प्रबोधन पर व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, अन्नदान, रक्तदान शिबिर असे विविध समाज उपयोगी उपक्रम आयोजित करून समाजासाठी योगदान देत राहिलेले आहेत.

 आणि एवढेच नव्हे तर महापुरुषांच्या जयंतीदिनी त्यांची वक्तृत्व शैली आणि परखड मत मांडण्याची पद्धतीमुळे ते विविध ठिकाणी खेडोपाडी, गावोगावी, वाडी, तांड्यावर जाऊन समाज प्रबोधनाचं काम देखील त्यांनी केलेले आहे. 

वंचित, शोषित, पीडित, कष्टकरी, कामगारांच्यावर अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या असतील पीडित समाजावर बहिष्कार झाला असेल दलिता वरील हल्ले मिरवणुका वरील दगडफेकी अशा प्रसंगी तेव्ह त्यांना न्याय मिळवून देण्याचं कामही केलेला आहे. वेळप्रसंगी धरणे, निदर्शने, रस्तारोको. मोर्चा यासारखे विविध सामाजिक आंदोलन देखील त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन समाजासाठी योगदान दिलेल आहे. समाजातील अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, तरुणांच्या बेकारी आणि व्यसनाधीनता दूर व्हावी म्हणून कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि जागृतीचं काम केलेलं आहे. त्यांची सुरुवात ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलं आणि अँड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सक्रियपणे सहा वर्ष कार्यरत होते. आणि त्यानंतर विद्यमान आत्ता ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव म्हणून काम करत आहेत, त्यांचं सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान राहिलेल आहे, एवढेच नव्हे तर त्यांच्या मूळ गावी तुप्पा या ठिकाणी ते ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी म्हणून तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष सहा वर्ष, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष चार वर्ष आणि आरोग्य समितीचे सदस्य सहा वर्ष म्हणून देखील काम केलेले आहे. या सर्व कामाची दखल घेऊन अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स च्या वतीने देण्यात येणारा छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार हा दिनांक 26 जून 2026 रोजी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या पुरस्कार प्राप्त झाल्या मुळे विविध समाजातील आणि स्तरातील लोकांनी शुभेच्छांचा वर्षाव व्यक्त करून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

 हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे नक्कीच आणखी समाजासाठी काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली आहे. असे रवि पंडित तुप्पेकर यांनी व्यक्त केले.


Leave a Comment

error: Content is protected !!